आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

दर्पण न्यूज भिलवडी : – सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 300जयंती साजरी करण्यात आली.
जवान दीपक रमेश नावडे यांचे हस्ते अहिल्याबाईंच्या फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून अहिल्यादेवींच्या जीवन व कार्याची थोडक्यात माहिती सांगितली.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे, विश्वस्त जी जी पाटील गुरुजी, संचालक जयंत केळकर ,माजी सरपंच श्री. टकले महावीर चौगुले महावीर वठारे व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रंथपाल मयुरी नलवडे यांनी आभार मानले.