सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे डॉ रंगनाथन जयंती, ग्रंथपाल दिन उत्साहात

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी डॉक्टर रंगनाथन जयंती आणि ग्रंथपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर विकास खराडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विकास खराडे यांचे हस्ते डॉक्टर रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ग्रंथपाल दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने ग्रंथपाल प्राध्यापक डॉक्टर विकास खराडे ग्रंथपाल संजय तावदर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौभाग्यवती मयुरी नलवडे यांचा ग्रंथ भेट देऊन वाचनालयाचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विकास खराडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर रंगनाथन यांनी जगभर वाचन चळवळ रुजवली ग्रंथालयातील वर्गीकरण प्रणाली विकसित केली त्यामुळे आज समाजात ग्रंथालयांचे महत्त्व वाढू लागलेले आहे वाचन करणे हे एक संस्कार झाला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी संजय तावदर मयुरी नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. विकास खराडे सर यांनी यावेळी वाचनालयास पाच हजार रुपयांची देणगी दिली,या देणगीचा स्वीकार वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे सर यांनी केला.कार्यक्रमाचे संयोजन कार्यवाह सुभाष कवडे आणि ग्रंथालयाच्या प्रमुख लेखनिक सौ विद्या निकम यांनी केले. स्वागत प्रास्ताविक कवडे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष डी आर कदम सर वाचनालया चे संचालक जयंत केळकर सर जेष्ठ नागरिक संघटनेचे बी डी पाटील सर श्री हणमंतराव शिंदे गजानन माने प्रथमेश वावरे आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते


