जम्मू काश्मीर सिंदूर महारक्तदान यात्रेत सेवा तळमिळीची अन् आपुलकीची ; रक्तविर समाधानी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पै चंद्रहार पाटील यांचे मस्त नियोजन







दर्पण न्यूज जम्मू काश्मीर (अभिजीत रांजणे) -: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि देशातील पहिल्या जम्मू काश्मीर सिंदूर महारक्तदान यात्रेमध्ये सेवा तळमिळीनं अन् आपुलकीनं दिली जात आहे. त्यामुळे रक्तविरातून समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त होत असून खरोखरच या इतिहास घडविणाऱ्या महारक्तदान यात्रेमध्ये आमचा सहभाग अभिमास्पद आहे, असे ही काहीजणांनातून बोलले जात आहे.
सांगली रेल्वे स्टेशन येथून सिंदूर महारक्तदान यात्रेला दिनांक 5 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला. जम्मू काश्मीर येथे निघालेल्या धर्मवीर एक्सप्रेसचा शुभारंभ उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला तर जम्मू येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समारोप केला. या समारोप कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोषपूर्ण भाषणाने रक्तविरांचा आत्मविश्वास वाढला.
पै चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असताना सांगितलेले किस्से अनेकांच्या मनात चिरकाल राहणाऱ्या ठरतील.
दरम्यान, सांगली रेल्वे स्टेशन येथून सिंदूर महारक्तदान यात्रेला दि 5 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला. त्यावेळेपासून आज दि 12 ऑगस्टपर्यंत नियोजन अत्यंत नेटके , तळमळीने आणि आपुलकीने असल्याचे पहावयास मिळाले. सेवा करणारे स्वयंसेवक, डॉक्टर सकाळी सहा वाजल्यापासून रात्री 2 ते 3 करतात. सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, रात्री जेवण, ट्राफिक जाम असल्यास जेवणास उशिर झाला तर सुकामेवासह इतर वस्तूही पुरवतात. सांगण्याची बाब म्हणजे हे स्वयंसेवक प्रथम रक्तवीरांची जेवणाची सोय केल्यानंतर जेवण करतात.
काहीजणांना असेही वाटले असेल की आपण स्वयंसेवकांचे जास्त कौतुक करत आहे. परंतु गेल्या आठ दिवसापासून आपण नुसार प्रवास करतो हे स्वयंसेवक प्रवास करण्याबरोबर बाराशे ते तेराशे रक्तवीरांची दिवस- रात्र सेवा करीत आहेत. आपण मंडळी ही सहकार्य करतों आहे , आता एकच रात्र राहिली आहे . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सिंदूर महारक्तदान यात्रेला कुठेही गालबोट लागू नये यांची खबरदारी घेऊन इतिहास घडविणाऱ्या महारक्तदान यात्रेला सहकार्य करूया.


