शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे : शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड
पलूस तालुक्यातील नदीकाठावरील शाळांची पाहणी

* भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील नदीकाठावरील शाळांची पाहणी आज सांगली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी केली. शाळांमध्ये समक्ष जाऊन शाळेतील महत्त्वाचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवली आहे का याची खात्री केली. शिक्षकांनी महत्त्वाचे रेकॉर्ड,दप्तर हे शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर त्याचबरोबर जिथे पुराचे पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवलेचे दिसून आली. काही शाळांनी महत्त्वाचे रेकॉर्ड हे शिक्षकांनी त्यांचे घरी ठेवलेले आढळून आले. शालेय पोषण आहार , तांदूळ धान्यादि माल इत्यादी सुरक्षित ठेवल्याची खात्री केली. पूर परिस्थितीमध्ये विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षक यांनी स्वतःची काळजी घ्यावी याबाबत सूचना केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन अध्ययन अध्यापन करणे बाबत सूचना केली. त्याचबरोबर शासन स्तरावरून सुरु असलेला शिक्षण सप्ताह उपक्रमाची अंमलबजावणी कशी सुरु आहे याबाबत माहिती घेतली. सुरू असलेल्या शिक्षण सप्ताह मधील उपक्रमाचे फोटो, व्हिडिओ दिलेल्या लिंक मध्ये तात्काळ भरणेची सूचना दिली गेली. पलूस तालुक्यामध्ये शिक्षण सप्ताह प्राथमिक त्याचबरोबर माध्यमिक शाळा मधून अतिशय उत्साहाने घेतला गेल्याचे दिसून आले. या सप्ताहामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक ग्रामस्थ यांचाही सहभाग घेतलेचे दिसून आले. शिक्षणाधिकारी यांनी पलूस तालुक्यातील औदुंबर, चोपडेवाडी, बोरवन, सुखवाडी या शाळांना समक्ष भेट दिली. जर ग्रामस्थांना निवाऱ्याची गरज लागली तर शाळांमधील खोल्या सर्व सुविधांनी युक्त देणे बाबत शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. त्यांचे सोबत प्रकाश कांबळे गटशिक्षणाधिकारी ,दिपक सकळे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक श्री प्रताप मोकाशी,श्री राजेंद्र कांबळे, सौ सरोज गुरव , स्मिता पाटील,सुरेखा दीक्षित उपस्थित होते.