कोल्हापूर येथील राजारामपूरी पोलिस ठाण्याच्या हद्दितील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार्या मंङळाची बैठक संपन्न

कोल्हापूरःअनिल पाटील
कोल्हापूर येथील खरे मंगल कार्यालय येथे आज राजारामपुरी पोलिस. ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव साजरे करणारे सार्वजनिक मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती.अशी माहीती राजारामपूरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सूशांत चव्हाण यांनी दिली. या बैठकित पो.नि. सूशांत चव्हाण म्हणाले की””
या बैठकीमध्ये गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉलबीचा वापर करण्यात येऊ नये.
“”” गणेश उत्सव मंडळांनी डॉल्बी मुक्त व पारंपारिक वाद्याच्या वापर करावा, गणेश मूर्ती लहान व आकर्षक असावी.
“””गणेश मूर्ती जवळ 24 तास स्वयंसेवक हजर ठेवावे.
“” सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नये,
“” आक्षेपार्ह संदेश, व्हिडिओ, फोटो व्हायरल झालेला आढळून आले असता तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा परस्पर कोणीही निर्णय घेऊ नये व कायदा हातात घेऊ नये.
“” आपल्या परिसरामध्ये अमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे असतील त्यांची माहिती तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये कळवावी.
“”मिरवणूक वेळेत काढून वेळेत समाप्त करावी. ध्वनी प्रदूषण कायद्याचे पालन करावे इत्यादी सूचना दिल्या. “”गणेश मंडळांनी आपल्या गणेश मंडपामध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे. तसेच गणेशोत्सव काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आहे.
सदर बैठकी करिता 150 ते 200 गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.