मौजे वसगडे येथे भिलवडी मंडळातील गावांसाठी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
महसूल सप्ताहाचे आयोजन ; तहसीलदार दिप्ती रिठे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप


दर्पण न्यूज भिलवडी :
महाराष्ट्र शासनामार्फत राज्यभर दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पलूस तालुक्यातील मौजे वसगडे येथे भिलवडी मंडळातील सर्व गावांसाठी दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
त्यामध्ये पुढील प्रमाणे लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला
लक्ष्मी मुक्ती योजना -23
जिवंत सातबारा अभियान -14
संजय गांधी योजना -15
पुरवठा विभाग- 31
सातबारा दुरुस्तीची प्रकरणे -18
सातबारा वाटप-65
खाते उतारा वाटप -32
फेरफार वाटप -15
तलाठी उत्पन्न दाखले- 46
ई पीक पाहणी -7
आधार कार्ड संबंधित सेवा -27
पशुसंवर्धन विभागाकडील जंत निर्मूलन व मका बियाणे वाटप -59
मंडळ अधिकारी चौकशी अहवाल -19
महा-ई-सेवा केंद्र मार्फत 32 दाखल्यांचे वाटप
यामध्ये प्रामुख्याने माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अजेंडा वरील असणारा अवयव दान या मोहिमेमध्ये भिलवडी मंडळातील एकूण 23 नागरिकांनी अवयव दान करण्याचा निर्धार केला. त्यांनी अवयव दान केले बाबत त्यांना प्रमाणपत्राचे वाटप तहसीलदार दिप्ती रिठे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तहसीलदार दिप्ती रिठे म्हणाल्या की, अवयव दान हे श्रेष्ठ दान मानून सर्व नागरिकांनी जो निर्धार केला आहे तो खरंच वाखाण्याजोगा आहे.
सदर मेळाव्यासाठी खटाव गावचे सरपंच ओंकार पाटील, मंडळ अधिकारी भिलवडी व भिलवडी मंडळातील सर्व तलाठी यांनी व तहसील कार्यालयातील संजय गांधी विभाग व पुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते.


