कृष्णाकाठ उद्योग समूह, जे के बापू जाधव मित्र परिवाराच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा खासदार शरदचंद्रजी पवार यांचा सत्कार

पलूस : *रयत शिक्षण संस्थेच्या रामानंदनगर (बुर्ली) ता.पलूस येथील आर्टस, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजचा डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर नामकरण सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृष्णाकाठ उद्योग समूहाच्या वतीने तसेच जे के बापू जाधव मित्र परिवार यांच्या वतीने सुधीर (भैय्या) जाधव व अनिल (दादा) जाधव यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा खासदार शरदचंद्रजी पवार, यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सीलचे सदस्य आमदार डॉ. श्री विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम, खासदार विशाल दादा पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र (आप्पा) लाड, मॅनेजिंग कौन्सीलचे सदस्य मा रामशेठजी ठाकूर, मॅनेजिंग कौन्सीलचे सदस्य जे के (बापू) जाधव, माजी आमदार मोहनरावजी (दादा) कदम, चेअरमन चंद्रकांतजी दळवी, व्हा चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, मा श्री शिवाजीराव कदम (सर) कुलपती भारती विद्यापीठ पुणे, रयत शिक्षण संस्थेचे संघटक मा डॉ अनिल पाटील, तसेच रयत शिक्षण संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व परिसरामधील प्रमुख मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक सेवक मोठ्या संखेने उपस्थित होते.*