शिष्यवृत्ती, गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता योजनांचे अर्ज भरण्याचे आवाहन

सांगली : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती फ्रिशीप, छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता या योजनांचे अर्ज भरण्याबाबतची लिंक सुरु करण्यात आली असून अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी https://mahadbt.maharashtra .gov.in या संकेतस्थळावर या योजनेचा अर्ज भरावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
जे विद्यार्थी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात या योजनांचे अर्ज भरु शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याबाबतची मुदतवाढ ही दि. 31 मार्च 2025 पर्यंत देण्यात आली असुन सदर शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती व प्रवर्गातील जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन 2023-24 व सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित प्रवर्गाचे अर्ज भरण्याबाबत सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावून आपल्या महाविद्यालयातील एकही अनुसुचित जाती प्रवर्गातील या योजनेस पात्र विदयार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सन 2024-25 वर्षातील महाविद्यालयाची प्रोपाईल अद्ययावत करणे तसेच फी मंजूर करुन घेण्यास देखील चालू झाले असून वरील संकेत स्थळावर जाऊन आपल्या महाविद्यालयाची प्रोपाइल अद्ययावत करुन सन 2024-25 वर्षाची फी ॲप्रावल करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.