सामाजिक भान अन् तळमळीने काम करणाऱ्या मत द्या ; शिवसेनेचे बसवराज उर्फ सियाराम पाटील

दर्पण न्यूज मिरज/सांगली (अभिजीत रांजणे): गरिबीची जाण आहे, सामान्य कुटुंबांच्या समस्यांची जाण आहे. मला ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या विकासासाठी, युवकांच्या कल्याणाविषयी जाण आहे. सामाजिक भान अन् तळमळीने काम करणाऱ्या माझ्यासारख्या उमेदवाराला मत द्या , असे आवाहन सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक १७ मधील शिवसेनेचे उमेदवार बसवराज ऊर्फ सियाराम पाटील यांनी केले आहे .
शिवसेनेचे उमेदवार बसवराज ऊर्फ सियाराम पाटील यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून मी सांगलीसह महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्यातील गोरगरिबांची सेवा करत आहे. गोरगरीब टेलर व्यावसायिकांना न्याय मिळवून दिला आहे. हे काम अविरत सुरू असणार आहे. सांगली शहरातील नागरिकांची निःस्वार्थ सेवा करत आलो आहे. ही सेवा पूर्णतः माझ्या कष्टाच्या पैशातून केली आहे. आजवर प्रामाणिकपणे काम करत जनतेच्या सेवेत राहिलो. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात 17 मध्ये यासाठी सातत्याने प्रयत्न केला. प्रभाग १७ निश्चितपणे परिवर्तन घडवून आणण्याचा माझा मानस आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या व क्रीडासाहित्य वाटप, काही विद्यार्थ्यांना शिक्षण फीसाठी मदत, बापट मळा येथील महावीर उद्यानात सलग १६ वर्षे हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन, वटपौर्णिमेनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू आणि विशेष पारंपरिक उपक्रम स्वखर्चाने केले आहेत. बापट मळा परिसरात खासदार निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसवणे, महिलांसाठी टेलरिंग वर्कशॉप, तसेच शासकीय योजनांतून कर्जवाटप, राज्यस्तरीय टेलरिंग व्यावसायिकांसाठी ‘टेलरिंग एक्स्पो’चे आयोजन, शिवजयंती, गणेशोत्सव साजरे केले आहेत. समाजात जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रम राबविले आहेत.
बसवराज पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्याशी माझी घट्ट मैत्री आहे. मंत्री महोदय आबिटकर साहेब यांच्या मदतीने प्रभाग क्रमांक 17 चा सर्वांगिण विकास करता येईल. मतदार बंधू आणि भगिनींनो कुणाच्या आश्वासनांना बळी पडू नका. अहोरात्र मेहनत करणार्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला मतदान करावे. एक संधी मलाही द्यावी, नक्कीच मी आपण दिलेल्या संधीचे सोने करून दाखविन. आपणास कळकळीची आणि तळमळीने विनंती करतो, आपली साथ माझ्यासारख्याला द्यावी, असे आवाहनही बसवराज पाटील उर्फ ज्यूनियर रजनीकांत यांनी केले.
शिवसेनेतर्फे प्रभाग १७-अ मधून मी बसवराज पाटील आणि माझ्याबरोबर १७ब मधून मयुरी शिंदे, १७-क मधून मृणाल पाटील, १७-ड मधून नानासाहेब शिंदेसह आम्ही निवडणूक लढवत आहोत. 15 जानेवारीला आम्हाला मतदान करावे. आम्ही नक्कीच आपलं ऋणी असेल, असेही बसवराज पाटील यांनी सांगितले.



