खासदारांच्या पत्नी पूजा विशाल पाटील यांचा प्रभाग क्रमांक ११ मधील काँग्रेसच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार




दर्पण न्यूज मिरज/सांगली :- सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार :-१) रमेश रामचंद्र सर्जेर्ज (अ),२) अश्विनी नंदकुमार कोळेकर (ब),३) अंजली अजित जाधव (क),४) हर्षवर्धन प्रतिक पाटील (ड) यांच्या प्रचारासाठी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा विशालदादा पाटील यांचा पुढाकार दिसत आहेत. महिलांचा फौजफाटा घेऊन पूजा पाटील या प्रभाग क्रमांक 11 मध्ये घरोघरी मतदार बंधू भगिनी यांच्या भेटी घेत आहेत.
सांगली येथील प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व काँग्रेस उमेदवारांच्याा प्रचारार्थ पूजा विशालदादा पाटील यांनी महिलांना बरोबर घेऊन पदयात्रा व प्रचारसभा पार पडली.
प्रभाग 11 नेहमीच काँग्रेस पक्षामागे ठामपणाने उभा राहिला आहे. खासदार विशाल पाटील यांच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास केला जाईल तसेच निवडून येणारे सर्व उमेदवार या प्रभागातील लोकांना न्याय मिळवून देईल, असे सांगितले.
येणाऱ्या 15 जानेवारी रोजी मतदार बंधू भगिनी यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान करावे, असे आवाहन पूजा विशाल पाटील यांनी केले.



