दूधगंगा धरणाच्या सांङव्यावरून आज दुपारी दोन वाजता 2000 घनफुट प्रतिसेकंद प्रमाणे विसर्ग सोङणार ; कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मीता माने यांची माहिती

कोल्हापूरः अनिल पाटील
दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे. धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. धारणातील पाणी पातळी नियंत्रित करणेकरिता आज दिनांक 27/07/2025 दुपारी 2 वाजता धरण सांडव्यावरून नदीपात्रामध्ये 2000 घनफूट प्रतिसेकंद प्रमाणे विसर्ग सोडणेत येणार आहे. नदीपात्रामधील पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे. अशी माहीती कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दूरध्वनीवरून दिली.
त्या म्हणाल्या की””पावसाचे प्रमाण, पाण्याची आवक यानुसार विसर्ग वाढविणेत येणार आहे. नदीकाठावरील सर्व गावकरी, ग्रामस्थ, शेतकरी यांना याद्वारे विनंती की नदीपात्रमध्ये उतरू नये, नदीपात्रालगत असणारे साहित्य, जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणेत यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.