टाकळीभान येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

दर्पण न्यूज टाकळीभान: रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ,थोर शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे, टाकळीभान विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मंजाबापू थोरात, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राहूलभाऊ पटारे, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम . शिंदे , पर्यवेक्षक एस.एस . जरे , माजी विद्यार्थी प्रतिनिधी बबलू वाघुले यांच्या हस्ते पद्मभूषण डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरमधून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची टाकळीभान गावातून ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली . श्रीरामपूर मार्केट कमिटीचे माजी सभापती नानासाहेब पवार, प्रगतशील शेतकरी किशोर पटारे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, अशोक कारखान्याचे माजी संचालक प्रा. कार्लस साठे,ग्रा .पं. सदस्य सुनिल बोडखे ,प्रा . जयकर मगर, अनिल बोडखे, सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब शिंदे, मधुकर मैड,अशोक तऱ्हाळ , बाळासाहेब शेळके, दिलीप शिंदे, गणेश कोकणे,मधुकर गायकवाड, विष्णुपंत पटारे, बंडू हापसे,बाळासाहेब खुरुद त्याचबरोबर टाकळीभान मधील माता भगिनींनी ठिकठिकाणी मिरवणूकीचे स्वागत केले . यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या . विद्यार्थ्यांच्या लेझीम, झांज आणि टिपरी नृत्याने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते . या मिरवणूकीसाठी बाबासाहेब गायकवाड, दादासाहेब कापसे, गणेश नानासाहेब पटारे ,एकनाथ रणनवरे, रोहित वाघुले, अमोल सुर्वे आदींनी सहकार्य केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व सेवकांनी परिश्रम घेतले .