सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वैशाली जाधव प्रथम
"चला करुया गणिताशी मैत्री" या बहुउद्देशीय शैक्षणिक साहित्याचा सहभाग : अमरावती येथे फेब्रुवारीत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी वैशाली जाधव यांची निवड

दर्पण न्यूज सांगली. :- नुकत्याच झालेल्या ५२ व्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन, महावीर स्टेट अकॅडमी, कसबे डिग्रज तालुका मिरज, जिल्हा – सांगली यांनी आयोजीत केलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षक गटात जिल्हा परिषद शाळा नं. १ बेडग च्या उपशिक्षीका सौ वैशाली नितेंद्र जाधव यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
यावेळी विज्ञान परिवेक्षक माध्य. विभाग सौ गीता शेंडगे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री राजेसाहेब लोंढे, महावीर अकॅडमीचे संस्थापक श्री. पाटील, अध्यक्ष श्री. चौगुले, गणित विज्ञान मंडळाचे अध्यक्ष व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत सौ . वैशाली जाधव यांनी ‘ चला करुया गणिताशी मैत्री’ हे बहुउद्देशीय शैक्षणिक साहित्य तयार केले होते. हे साहित्य कृतीयुक्त आनंददायी, ज्ञानरचनावादी, अध्ययन निष्पत्तीवर आधारीत गणित विषयाचे बहुउद्देशीय साहित्य आहे. सौ.वैशाली जाधव यांनी आजपर्यंत शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
दि. २८ जानेवारी २०२५ ते १ फेब्रुवारी २०२५ ला अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सौ. वैशाली जाधव यांची निवड झाली आहे, त्याबदद्ल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.