तासगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत कापूर ओढ्यावर बेवावारस मयत पुरुष आढळला
इसमाबाबत माहिती मिळाल्यास तासगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा तासगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये कापूर ओढा दक्षिण तीरावर तासगाव या ठिकाणी एक बेवावारस अनोळखी मयत पुरुष इसम मिळून आलेला आहे.या बाबत तासगाव पोलीस ठाणे अकस्मात मयत क्रमांक 144/2025 BNNS 193 प्रमाणे नोंद केली आहे. सदर इसमाबाबत माहिती असल्यास तासगाव पोलीस ठाणे संपर्क साधावा .
मयताचे वर्णन* वय अंदाजे 35 ते 40 वर्ष रंग सावळा बांधा मध्यम परिधान कपडे पिवळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट डाव्या हातामध्ये पिवळ्या रंगाचे घड्याळ उजव्या हातामध्ये कडे तसेच उजव्या हातावर मनगट ते कोपरापर्यंतच्या मधल्या भागामध्ये गोंदलेले देव देवतांचे चित्र न आहे . वरील इसम याचे नातेवाईक मिळून आल्यास खालील नंबर वर संपर्क करावा.
संपर्क क्रमांक
1) पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ 9923494280
2) सपोनी दीपक पाटील ९५२७८५०९०५
3) सुहास खुबीकर 9890939829 , अशी माहिती तासगाव पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे. या घटनेची भिलवडी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.