“सिंदूर” मधील सहभागी भिलवडी गावचे सुपुत्र वीर जवान दीपक नावडे यांचा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते सन्मान

दर्पण न्यूज भिलवडी :- भारत पाकिस्तान युद्धामध्ये ऑपरेशन सिंदूर मध्ये सक्रिय सहभागी असणारे भिलवडी गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील वीर जवान दीपक नावडे यांचा सत्कार पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केला. यावेळी खासदार विशाल पाटील उपस्थित होते.
दरम्यान ,अरिहंत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस शाखा माळवाडीचा प्रथम वर्धापन दिनी वीर जवान दीपक नावडे यांनी या युद्धातील थरारक अनुभव
अरिहंतच्या मंचावर ग्रामस्थांपुढे मांडला. यावेळी त्यांचे अनुभव ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यासमोर अक्षरश: युद्धाचे दृष्य उभे राहिले.
शनिवार दि. 28 जून 2025 रोजी अरिहंत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस शाखा माळवाडीचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी संपन्न झाला. अरिहंतच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ऑपरेशन सिंदूर मध्ये सक्रिय सहभागी झालेले दिपक नावडे यांच्यासह भिलवडी आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष… माजी सैनिक कुमार पाटील, उपाध्यक्ष मुकुंद तावदर, जितेंद्र मराठे, सलीम मुल्ला तसेच सध्या भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असलेले जवान मुकेश वावरे या
आजी माजी सैनिकांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शितल किणीकर व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते शाल,सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना वीर जवान दिपक नावडे यांनी आपले अनुभव सांगितले. त्यांचे अनुभव ऐकताना उपस्थितांच्या अंगावरती शहारे आले होते. त्याचबरोबर आपल्या या वीर जवानासह भारतीय सैन्याबाबत अभिमान देखील वाटत होता. या सत्कार सोहळ्याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शितल किणीकर, संस्थेचे पलूस व माळवाडी शाखेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी वृंद यांच्यासह अरिहंत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस, शाखा माळवाडीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या शेकडो महिलांसह ग्रामस्थ उपस्थित होते.