पोदार प्रेप धाराशिव येथे पालकांचा द्वितीय पालक मेळावा उत्साहात

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे):-
पोदार प्रेप धाराशिव येथे 28/06/25 रोजी पालकांसाठी द्वितीय पालक मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रम कशा पद्धतीने राबविले जातात याचे प्रात्यक्षिक शिक्षकांनी दाखविले व पालकांनी सुद्धा त्यात सहभाग घेतला जसे कविता गायन, संख्या वाचन, इंग्रजी वाचन या सर्व उपक्रमांना अत्याधुनिक खेळांद्वारे पालकांना समजून सांगण्यात आले तसेच कार्यक्रमात येत्या शैक्षणिक वर्षातील नियमावली बद्दल सुद्धा माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरवातीला पोदार प्रेप च्या संचालिका डॉ स्वाती पोपट वत्स मॅडम यांनी संदेशपर पालकांशी संवाद साधुन शुभेच्छा दिल्या. व पोदार प्रेप च्या मुख्याध्यापिका श्रीमती रेश्मा संकपाळ आणी शाळेचे कार्यकारी अधिकारी श्री जीवन कुलकर्णी यांनी पालकांचे आभार प्रकट केले. पालक वर्गाने भरभरून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.