रामानंदनगर येथे महारेल च्या कामांची चौकशी व्हावी यासह इतर मागण्याकरिता सतराव्या दिवशीही अख्तर पिरजादे यांचे आंदोलन सुरूच
आंदोलन स्थळी डॉ.दिलीप पटवर्धन यांनी दिली भेट

दर्पण न्यूज पलूस :- किर्लोस्करवाडी येथे उड्डाणपूल आणि भुयारी पुलाची कामे चुकीच्या पद्धतीने झाली आहेत याचा भविष्यकाळात सर्वांना त्रास होणार आहे. यामुळे अनेक अपघात होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू होणार आहे. महा रेल ने चुकीच्या पद्धतीने ही कामे केली असून एम आर आय डी सी च्या सर्व कामांची चौकशी व्हावी व दोषी असणाऱ्या सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई होऊन झालेल्या खर्चाची भरपाई त्यांच्याकडूनच वसूल करून घ्यावी.यासह इतर मागण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ पत्रकार अख्तर पिरजादे यांनी किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा सतरावा दिवस होता.आंदोलनाच्या ठिकाणी सांगलीचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी भेट दिली मागण्या समजावून घेतल्या. किर्लोस्करवाडी स्टेशन कडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे ही त्यांनी मान्य केले. यावेळी माजी सरपंच जयसिंग नावडकर, भानुदास माने, महेश कोरे, श्रीकृष्ण औटे,जनार्दन शेळके, शहाजी मोरे, दलित महासंघाचे युनूस कोल्हापुरे,रॉनी आवळे, सुवासे, तसेच कुमार कांबळे,अशपाक शिकलगार, सुनील नलवडे,ताजबी शिकलगार,संदीप वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.यावेळी माजी सरपंच जयसिंग नावडकर म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी केलेल्या मागण्या अगदी योग्य आहेत या पुलावरून ऊस वाहतूक, अवजड वाहतूक होणार नाही.अनेक अपघात होणार आहेत. यासह इतर सर्व मागण्यांचा विचार शासनाने करावा, उपस्थित सर्वांनी यावेळी पाठिंबा दिला. अख्तर पिरजादे म्हणाले, रेल्वे संबंधी 22 मागण्या व इतर मागण्या घेऊन मी आंदोलनाला बसलो आहे. आज सतरावा दिवस आहे अजून महिना लागला तरी चालेल,सर्व मागण्या होईपर्यंत माझा लढा सुरूच राहील. संबंधित लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन मागण्या पूर्ण होण्याकरिता प्रयत्न करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असेही पिरजादे म्हणाले.