पालकमंञी प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 जुलैला””माझा एक दिवस” माझ्या बळीराजासाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणार

कोल्हापूर, ः अनिल पाटील
सार्वजानिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये 1 मे ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमानता अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध शासकिय विभागामार्फत वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी व अंमलबजावणी करण्यात येत आहे. “माझा एक दिवस, माझ्या बळीराजासाठी” हा नाविन्यपूर्ण महत्वाकांक्षी उपक्रम दि.०५.जुलै २०२५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे.
यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी/ शासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी हा उपक्रम निश्चित करणेत आलेला आहे. या उपक्रमामध्ये सर्व लोकप्रतिनिधी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व अधिकारी,पदाधिकारी, प्रगतशील शेतकरी, रीसोर्स बँक मधील शेतकरी, आत्मा शेती सल्लागार समिती, शासकीय यंत्रणेकडे नोंदणीकृत गट, आत्मा अंतर्गत शेतकरी मित्र सहभागी होणार आहेत. तसेच गावस्तरावर ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी हे आपल्या विभागाच्या विविध योजना /उपक्रम बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
शेतक-यांना येणा-या अडचणी व प्रश्न प्रशासनाने समजून घ्यावेत, त्यावर कोणत्या उपाययोजना करुन धोरणात्मक निर्णय घ्यावेत यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतक-यांसोबत काम करून शेतकर्यांना प्रोत्साहन देणारा आणि शेतीशी नाते जोडणारा अभिनव उपक्रम प्रत्यक्ष पेरणी, फळबाग लागवड द्वारे राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधु, लोकप्रतिनिधी , पदाधिकारी, युवक व महिला, तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.