महाराष्ट्रसामाजिक
राधानगरी तालुक्यातील “पनोरी “”फराळे रस्ता वाहतूकीसाठी खूला : तहसिलदार अनिता देशमुख यांची माहिती

कोल्हापूर ं अनिल पाटील
गेल्या दोन दिवसापासून राधानगरी धरण परिसरात संततधार अतिवूष्टी सूरू असल्याने पनोरी ते फराळे साखर कारखाना रत्यावर आज दरङ कोसळल्याने या रस्त्यावरून वाहतूक बंद होती. ही वाहतूक पर्यायी मार्गानी वळविण्यात आली होती. या घटनेची माहीती राधानगरीच्या कर्तव्यदक्ष तहसिलदार अनिता देशमूख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली.त्यांनी जे.सी. बी च्या सहाय्याने या रस्यावरील दरङ बाजूला करून रस्ता वाहतूकीस खूला केला.
दरम्यान राधानगरी तालूक्यात सूरू असलेल्या संततधार अतिवूष्टीमूळे राधानगरी येथील भाग्येश्री आनंदा तेली यांची घराची भिंत कोसळून मोठे नूकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. तसेच कासाळपूतळे येथील दिनकर बाजीराव कांबळे यांचे घर भूईसफाट झाले आहे. या घटनेत अंदाजे 90 हजार रूपयांचे नूकसान झाले आहे.