पै. सुभाष दादा पाटील युवा फाउंडेशन यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळा उत्साहात ; 150 लोकांचा सन्मान

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) –: पै. सुभाष दादा पाटील ” युथ फाउंडेशन महाराष्ट्र पिंपळगाव बुद्रुक तालुका कागल यांच्या वतीने सामाजिक ,शैक्षणिक ,युवा उद्योजक ,पत्रकार ,आरोग्य सेविका ,कला ,क्रीडा ,साहित्य अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या देशातील 150 लोकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी युथ फाऊंडेशन चे अध्यक्ष पैलवान सुभाष दादा पाटील, मा. श्री रंगराव पाटील साहेब ब्रॅंच पोस्ट मास्तर पिंपळगाव मा. सौ. रागिनी खडके मॅडम इन्स्पेक्टर धर्मादाय कार्यालय कोल्हापूर कार्याध्यक्ष बाळूमामा देवालय आदमापूर, मा. सौ. स्मिता राणी गुरव पंचायत समिती सभापती गारगोटी, मा. सौ. वैशाली झांजगे मॅडम रयत विद्यार्थी विचार मंच जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री युवराज मिरजकर सर वेदिका कन्सल्टन्सी अँड सर्विसेस डायरेक्टर मा.सौ. अनिता रावण अध्यक्ष सावित्रीबाई महिला बहू उदय संस्था मानव सुरक्षा सेवा समिती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा.सौ. नंदाताई विभुते अध्यक्ष यशराज महिला मंच कराड व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या सर्व प्रमुख पाहुणेच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाची प्रास्ताविक सूत्रसंचालन अनिता घाडगे मॅडम यांनी केले.