भिलवडी येथील साने गुरुजी संस्कार केंद्राच्या वाचन स्पर्धेत पालवी शेटे हिचा प्रथम क्रमांक

दर्पण न्यूज भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील साने गुरुजी संस्कार केंद्राच्या पुस्तक वाचन स्पर्धेत इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कुमारी पालवी शेटे हिने 16 पुस्तके वाचून प्रथम क्रमांक प्राप्त केला. 15 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 या कालावधीत इयत्ता चौथी ते नववीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे हे 20 वे वर्ष होते. या स्पर्धेत इयत्ता चौथी ते नववी या वर्गातील भिलवडी आणि परिसरातील 38 विद्यार्थी सहभागी झालेले होते या स्पर्धेसाठी कोणतीही फी आकारण्यात आलेली नव्हती केंद्रातील 1000 बाल वाङ्मयाची पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली होती विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचून एका स्वतंत्र वहीत नोंदी करून ठेवलेल्या आहेत पाच जून पर्यंत विद्यार्थ्यांनी या वह्या संस्कार केंद्रात जमा केल्या 26 विद्यार्थ्यांनी वह्या जमा केलेल्या आहेत स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे आहे कुमारी पालवी शेटे प्रथम क्रमांक (16 पुस्तके) श्रीयुत अखिलेश सूर्यवंशी औदुंबर द्वितीय क्रमांक (15 पुस्तके) कुमारी अनन्या घोडके हिने (14 पुस्तके) वाचून तिसरा क्रमांक मिळविला उत्तेजनार्थ कुमार सक्षम पाटील (12 पुस्तके) आणि कुमार प्रणव दिलीप पाटील (8 पुस्तके) वाचून उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि संस्कारक्षम पुस्तके संस्कार केंद्राच्या रोप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत. संस्कार केंद्राचे हे रोप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे स्पर्धेचे संयोजन केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी केले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सार्वजनिक वाचनालय भिलवडीच्या ग्रंथपाल मयुरी नलवडे, लेखनिक विद्या निकम यांचे देखील बहुमोल सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना बालकवितांचे, बडबड गीतांचे आणि प्राणी कथांचे व बोध कथांचे वाचन करणे आवडते असे या स्पर्धेतून जाणून आले.