दहयारी येथे विकसित कृषि संकल्प अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्पण न्यूज पलूस :-
भारतीय कृषि अनुसंधान नवी दिल्ली,वसंत प्रकाश विकास प्रतिष्ठान संचलित कृषि विज्ञान केंद्र, सांगली , कृषि विभाग सांगली व प्रकल्प संचालक आत्मा सांगली यांच्या संयुक्त कार्यक्रमातून विकसित कृषि संकल्प अभियान हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम मंगळवार दिनांक 03.06.2025 रोजी दहयारी ता.पलूस जि.सांगली या गावात पार पडला. या कार्यक्रमाला कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील डॉ. श्री सचिन महाजन कृषि विज्ञान केंद्र कांचनपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. विपिन वाले, मृदा शास्त्रज्ञ शैलेश पाटील व कृषि विस्तार शास्त्रज्ञ सचिन कोल्हे हे शास्त्रज्ञ व कृषी तज्ञ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये ऊस, सोयाबीन , भुईमूग या प्रमुख पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन , क्षारपड जमीन व्यवस्थापन, माती परीक्षणानुसार खतांचे व्यवस्थापन, तसेच ऊस शेती व्यवस्थापन, नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच कृषि विभागातील विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.याप्रसंगी शेती करत असताना येणाऱ्या अनेक अडचणी समस्या तसेच आपले अनुभव शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या समस्यांचे चांगल्या पद्धतीने कृषी तज्ञांनी समाधान केले.सदर कार्यक्रमासाठी दह्यारी गावचे सरपंच जीवन कांबळे, गावातील प्रगतशील शेतकरी,कृषि विभाग पलूसचे मंडळ कृषि अधिकारी संजय कुमार खारगे, सहाय्यक कृषि अधिकारी सौ पुष्पा साळुंखे , कृषि सखी सौ क्रांती गायकवाड व सी आर पी सुमैयाँ मुलाणी तसेच मोठ्या संख्येने महिला व शेतकरी वर्ग उपस्थित होते. अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.