भिलवडी येथे सर्व जाती-धर्माच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
महिलांच्या वतीने छत्रपती शिवरायांचा पाणी, दूध आणि फुलांनी अभिषेक : शिव-शंभूभक्त प्रमोद जाधव यांनी दिली गारद

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे सर्व जाती-धर्माच्या बांधवांच्या वतीने भिलवडीच्या बाजार मैदानात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्साहामध्ये आणि अभिमानानं शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
प्रारंभी भिलवडीतील महिलांच्या वतीने छत्रपती शिवरायांचा पाणी, दूध आणि फुलांनी अभिषेक करण्यात आला.
सरपंच शबाना मुल्ला, माजी सरपंच विद्या पाटील,सीमा शेटे, सविता महिंद, ग्रामपंचायतीच्या सदस्या रेहाना फकीर, स्वप्नाली रांजणे, मृणाल पाटील अक्काताई गोरे, प्रगती पाटील प्रमुख उपस्थित होत्या.
शिव-शंभूभक्त प्रमोद जाधव याने गारद दिली.
यावेळी उपस्थित सर्वच समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध रंगांच्या फुलांची वृष्टी सुद्धा यावेळी करण्यात आली.
भिलवडी बाजार मैदानातील सर्व व्यापाऱ्यांना आणि ग्रामस्थांना साखर-पेढे वाटून हा शिवराज्याभिषेक दिवस आनंदाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व्यापारी एकता असोसिएशनने केले.