भिलवडी येथे विकसित कृषि संकल्प अभियानात तज्ञांचे मार्गदर्शन ; शेतकऱ्यांचा मोठा सहभाग

दर्पण न्यूज भिलवडी ;-भारतीय कृषि अनुसंधान नवी दिल्ली,वसंत प्रकाश विकास प्रतिष्ठान संचलित कृषि विज्ञान केंद्र, सांगली , कृषि विभाग सांगली व प्रकल्प संचालक आत्मा सांगली यांच्या संयुक्त कार्यक्रमातून विकसित कृषि संकल्प अभियान हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम सोमवार दिनांक 02.06.2025 रोजी भिलवडी ता.पलूस जि.सांगली या गावात पार पडला. या कार्यक्रमाला अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती येथील डॉ. अमृत बोरुडे , कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील डॉ. श्रीमंत राठोड ,कृषि विज्ञान केंद्र कांचनपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. विपिन वाले, मृदा शास्त्रज्ञ शैलेश पाटील व कृषि विस्तार शास्त्रज्ञ सचिन कोल्हे ,डॉ.अभिजित बारहते पशूवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ सातारा हे शास्त्रज्ञ व कृषी तज्ञ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये क्षारपड जमीन व्यवस्थापन, माती परीक्षणानुसार खतांचे व्यवस्थापन, तसेच निर्यातक्षम केळी व्यवस्थापन व ऊस शेती व्यवस्थापन, नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच कृषि विभागातील विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.याप्रसंगी शेती करत असताना येणाऱ्या अनेक अडचणी समस्या तसेच आपले अनुभव शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या समस्यांचे चांगल्या पद्धतीने कृषी तज्ञांनी समाधान केले.सदर कार्यक्रमासाठी भिलवडी गावच्या सरपंच मुल्ला मॅडम, गावातील प्रगतशील शेतकरी,कृषि विभाग पलूसचे तालुका कृषि अधिकारी श्री संभाजी पटकुरे , मंडळ कृषि अधिकारी संजय कुमार खारगे, उप कृषी अधिकारी उदय दौंड ,सहाय्यक कृषि अधिकारी सौ दिपाली मंडले, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रशांत पाटील तसेच मोठ्या संख्येने महिला व शेतकरी वर्ग उपस्थित होते. अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.