खटाव येथे विकसित कृषी संकल्प अभियान उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्पण न्यूज पलूस ; भारतीय कृषि अनुसंधान नवी दिल्ली,वसंत प्रकाश विकास प्रतिष्ठान संचलित कृषि विज्ञान केंद्र, सांगली , कृषि विभाग सांगली व प्रकल्प संचालक आत्मा सांगली यांच्या संयुक्त कार्यक्रमातून विकसित कृषि संकल्प अभियान हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम रविवार दिनांक 01.06.2025 रोजी खटाव ता.पलूस जि.सांगली या गावात उत्पासाहात र पडला. या कार्यक्रमाला अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती येथील डॉ. अमृत बोरुडे , कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील डॉ. श्रीमंत राठोड ,कृषि विज्ञान केंद्र कांचनपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. विपिन वाले, मृदा शास्त्रज्ञ शैलेश पाटील व कृषि विस्तार शास्त्रज्ञ सचिन कोल्हे ,डॉ.अभिजित बारहते पशूवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ सातारा हे शास्त्रज्ञ व कृषी तज्ञ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये क्षारपड जमीन व्यवस्थापन, पशु संगोपन समस्या व त्यावरील उपाय तसेच केळी व्यवस्थापन व ऊस शेती व्यवस्थापन, नैसर्गिक शेती यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच कृषि विभागातील विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.याप्रसंगी शेती करत असताना येणाऱ्या अनेक अडचणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी मांडल्या. सर्व अडचणी वरील अतिशय चांगले उपाय कृषि तज्ञ व शास्त्रज्ञ यांनी सुचविले.सदर कार्यक्रमासाठी खटाव गावचे सरपंच श्री ओंकार पाटील, प्रगतशील शेतकरी श्री तात्यासाहेब नागावे ,श्री आर.ए.पवार सर, श्री विजय चौगुले उपस्थित होते. कृषि विभाग पलूसचे तालुका कृषि अधिकारी श्री संभाजी पटकुरे , मंडळ कृषि अधिकारी संजय कुमार खारगे, सहाय्यक कृषि अधिकारी सौ दिपाली मंडले, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सौ धनश्री काटकर , कृषि सखी सौ स्वाती माळी तसेच मोठ्या संख्येने महिला व शेतकरी वर्ग उपस्थित होते. अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.