पलूस बसस्थानक येथे माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते नव्या ५ बसेसचे लोकार्पण
जिल्हा बँकेचे संचालक महेंद्रआप्पा लाड, मान्यवरांची उपस्थिती

दर्पण न्यूज पलूस ; सांगली जिल्ह्यातील पलूस बसस्थानक येथे माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते नव्या ५ बसेसचे लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मा. महेंद्रआप्पा लाड व इतर मान्यवरांच्या उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिन केक कापून साजरा करीत चालक, वाहक, आगार व्यवस्थापक व इतरांना सदिच्छा दिल्या.
यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, पलूस आणि परिसरातील नागरिकांसाठी अधिक सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायक प्रवासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
नव्या बसेसमुळे येथील ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. सार्वजनिक वाहतूक सेवेचे सक्षमीकरण हीच ग्रामीण विकासाच्या शाश्वत विकासाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे त्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. या बसेसमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गावांशी थेट संपर्क साधला जाईल आणि रोजगार तथा शिक्षणामुळे प्रवास करणाऱ्यांना मोठा लाभ होईल, असेही माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.यावेळी पलूस तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.