आरोग्य व शिक्षणग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक
सांगली ; शिष्यवृत्तीचे अर्ज 15 जून पर्यंत भरण्याचे आवाहन

दर्पण न्यूज सांगली : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रकीत्तर शिष्यवृत्ती फ्रिशीप, छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता या योजनांचे अर्ज https://mahadbt.maharashtra .gov.in या संकेतस्थळावर 15 जून 2025 पर्यंत भरावेत, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
जे विदयार्थी सन 2023-24 या मधील प्रलबिंत असलेले Re-Apply टँब उपलब्ध करुन दिलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी व सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनांचे अर्ज दि. 15 जून 2025 पर्यंत भरण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.