महाराष्ट्रराजकीयसामाजिक

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा सांगली जिल्हा दौरा

 

    दर्पण न्यूज   सांगली : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे रविवार, दिनांक 1 जून 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            रविवार, दिनांक 1 जून रोजी सकाळी 10 वाजता वाटेगाव ता. वाळवा येथे आगमन व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास भेट व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट. सकाळी 10.30 वाजता वाटेगाव येथील नियोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मभूमी राष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी भेट व जागेची पाहणी. सकाळी 11 वाजता वाटेगाव येथून इस्लामपूरकडे प्रयाण. सकाळी 11.25 वाजता इस्लामपूर येथे आगमन व शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयास भेट, कार्यकर्त्यांशी संवाद, स्थळ – मार्केट यार्ड इस्लामपूर. सकाळी 11.50 वाजता पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना ता. वाळवा येथे आगमन व आण्णांच्या समाधीस्थळास भेट व साखर कारखाना विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 12.20 वाजता साखर कारखाना विश्रामगृह येथून मिरजकडे प्रयाण. दुपारी 1.10 वाजता मिरज येथे आगमन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – रमा उद्यानजवळ मिरज. दुपारी 1.50 वाजता लुंबिनी बौध्द विहार व ग्रंथालय इमारत लोकार्पण सोहळा, स्थळ – योगीनगर, मिरज.  दुपारी 2.20 वाजता योगीनगर येथून आरग ता. मिरजकडे प्रयाण. दुपारी 2.40 वाजता आरग येथे आगमन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन केलेल्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या बौध्द विहार इमारतीची पाहणी. दुपारी 3 वाजता आरग येथून शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. दुपारी 3.20 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता सांगली जिल्हा शिवसेना पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक, स्थळ – पटवर्धन हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बागेजवळ, शिवाजी नगर, मिरज. सायंकाळी 5.30 वाजता मिरज, सांगली येथून मुंबईकडे प्रयाण.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!