काखे येथील ते अतिक्रमण काढल्या बद्दल आरपीआयचे उत्तम कांबळे यांचे पालकमंत्री आबीटकर यांच्याकडे पुन्हा बांधकाम करण्याची मागणी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) -: पन्हाळा येथील चर्मकार समाजाचे दादासो मारूती सुर्यवंशी यांचे जातिय द्वेष्यातून अतिक्रमण काढल्या बद्दल जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज मा पालकमंत्री ना प्रकाश आबिटकर साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. मु. पो. काखे तालुका पन्हाळा येथील चर्मकार समाजाचे दादासो मारूती सुर्यवंशी यांचे जातिय द्वेष्यातून अतिक्रमण काढल्या बद्दल जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज मा पालकमंत्री ना प्रकाश आबिटकर साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी जातीय काम करणाऱ्या संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात व संबंधित दादासो सूर्यवंशी यांचे शेड आहे त्या ठिकाणी परत व्यवस्थित करून द्यावे , अशी आक्रमक भूमिका दादांनी मांडली. संबंधित प्रकरणाची तपासणी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन नामदार पालकमंत्री साहेब व CO यांनी शब्द देऊन आश्वासित केले आल्यानंतर हि मिटिग वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे जिल्हा अध्यक्ष उत्तम दादा कांबळे नेतृत्वाखाली राज्य सचिव मंगलराव माळगे साहेब, कोल्हापूर शहर अध्यक्ष राहुल दादा कांबळे पन्हाळा तालुका अध्यक्ष अमर कदम, अन्थोनी कदम , सरदार तिवडे ,दादासो सुर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.