वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कणेरीवाडी येथे वाळवेकरांच्या रेन बो वॉटरपार्कचे उद्घाटन

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :—कणेरीवाडी (ता. करवीर) येथे श्री. प्रशांत वाळवेकर आणि संतोष वाळवेकर (रा. कागल) यांनी नव्याने सुरू केलेल्या रेन बो वॉटरपार्कचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले.*
*या उद्घाटन सोहळ्याने परिसरातील पर्यटन आणि मनोरंजन क्षेत्राला नवे बळ मिळवून दिले आहे. रेन बो वॉटरपार्क हे कणेरीवाडी परिसरातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरेल. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. या वॉटरपार्कमध्ये विविध जलक्रीडा सुविधा, स्लाइड्स, स्विमिंग पूल आणि कुटुंबांसाठी मनोरंजनाच्या विविध सोयी उपलब्ध आहेत.*
*मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी उद्घाटन प्रसंगी वॉटरपार्कच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या आणि स्थानिक उद्योजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे पर्यटन क्षेत्राला नवे आयाम प्राप्त होतील, असे प्रतिपादन मंत्री श्री मुश्रीफ यांनी केले.*
*यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, संजय ठाणेकर, प्रल्हाद गायकवाड, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.