हंचिनाला (के. एस.) येथे भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना, धम्म परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांची प्रमुख उपस्थिती

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) ;- निपाणी तालुक्यातील हंचिनाला (के. एस.) गावातील तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना व धम्म परिषद प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत काल बौद्ध विहार भीम नगर हचिनाळ येथे परिषद संपन्न झाली..या दोन्ही कार्यक्रमासाठी हचिनाळ बौद्ध धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिका,तरुण उपासक-उपसिका मोठ्या संख्येने पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित होते.शांतीचा मार्ग दाखविणाऱ्या भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी या कार्यक्रमात आयोजकांनी केलेल्या सत्काराचा स्वीकार जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा केला.यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा उपस्थितीत जनसमुदाया समोर बोलताना म्हणाले की तथागत भगवान गौतम बुद्धांचा बौध्द धम्म डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी स्विकारल्यानंतर या देशाचे संविधान लिहीत असताना संविधाना मध्ये समता,स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय हे बौध्द धम्माचे तत्व यांना अनुसरून धम्माचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
धम्म खूप मोठा आहे धम्माच आचरण करून त्रिसरण पंचशील,अष्टांगिक मार्ग,परित्राण पाठ या सर्व माध्यमातून गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा,अंतदीप व्हा या मार्गाने अंगीकार केले तर निश्चितच आपलं जीवन प्रगतीपथावर जाईल असा आशावाद व्यक्त करीत सर्व उपस्थित असणाऱ्या अनुयायांचे आभार जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी मानले.या प्रसंगी पु. भदंत आर आनंद थेरो, पु. भदंत समर्थक. डॉ. यश कश्यपन, पु. भदंत एस. संबोधी थेरो, पु. भदंत गोविंदो मानदो खासदार प्रियांका जारकोळी , आमदार शशिकला जोले, डॉ.सधानंद कांबळे ,वीर कुमार पाटील, प्रकाश चव्हाण, प्रकाश गाडेकर, रणजित कांबळे, अजित कांबळे, सुरेश कांबळे, राजू पोवार, संभाजी कोपार्डे, सुमित्रा मधाळे, यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी व गावकरी बंधु उपस्थित होते.