भगवान बुद्ध जयंतीच्या निमित्त सम्यक बौद्ध समाज संस्था, तारापूर- बोईसर येथे डॉ. संतोष भोसले यांचा धम्मचर्चेत संवाद

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :-
बुद्ध पौर्णिमा तथा भगवान बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सम्यक बौद्ध समाज संस्था, तारापूर- बोईसर जि. पालघर आयोजित धम्मचर्चेत डॉ. संतोष भोसले यांनी संवाद साधता आला. “बुद्ध विहार आणि बौद्ध समाज निर्मिती” या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. यामध्ये
१. विहार म्हणजे काय? तथागत बुद्धांना विहारांची गरज का वाटली?
२. विहारांचा उपयोग कशासाठी? धम्मचर्या, धम्मचर्चा, धम्माभ्यास, बौद्ध पूजा पाठ यांचे महत्त्व.
३. प्राचीन ते आधुनिक बुद्ध विहार निर्मितीचा इतिहास.
४. विहार निर्मितीत येणाऱ्या समस्या.
५. वज्जींचे सात नियम
६. विहारांनी धम्म वाढवला, प्रसारित केला. “विहार” हे बौद्ध सभ्यतेचे अविभाज्य अंग आहे.
७. विहार सक्रिय करण्यासाठीचे कृतीकार्यक्रम.
८. दर रविवारी बुद्ध विहारात जाण्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते.
९. जवळची श्रद्धास्थाने रूढ करणे.
१०. २४ नोव्हेंबर हा “भारतीय बौद्ध विहार सभ्यता दिन” म्हणून साजरा करावा लागेल.
११. इतर सर्व धर्मीयांची धार्मिक व्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे.
१२. ज्ञान देणे आणि घेण्याची परंपरा विहारात रूढ होणे आवश्यक.
१३. “सातत्य” हे धम्माचे द्योतक आहे.
१४. विहारातून निर्माण होणारी संघशक्ती प्रबळ आणि प्रभावी होऊ शकते.
१५. बौद्ध वारसा, विहारे, बौद्ध लेणी यांचे होत चाललेले ब्राह्मणीकरण याबाबत गावोगावची विहारे सक्रिय करून सातत्यपूर्ण जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
१६. शिक्षण, आरोग्य, क्रीडा, संगीत, प्रशासकीय सेवा, उद्योग व्यवसाय आणि राजकीय व्यवस्था सुदृढ बनविण्यासाठी “विहार” हे महत्त्वपूर्ण साधन आहे. इत्यादी मुद्द्यांवर सांगोपांग बोलता आले.
यावेळी सम्यक बौद्ध समाज संस्थेचे अध्यक्ष आयु. राजकुमार मेंढे, उपाध्यक्ष आयु. सी. एन. पाटील आयु. आर. पी. गायकवाड, सचिव आयु, राकेश शेवाळे, सहसचिव आयु, प्रकाश जांभुळकर, आयु. धर्मेंद्र राऊत, खजिनदार आयु. सुरेंद्र आवळे, स्थायी समिती सदस्य आयुनी. अश्विनी गायकवाड, आयु. संदेश गायकवाड, आयु. प्रवीण कदम, आयु. संदीप यशवर्धन, आयु. रवींद्र नेटकर, आयु. सिद्धार्थ सोनोने, आयु. पी. व्ही. धामढेरे, आयु. बिट्टू वानखेडे, आयु. शांतशील सहारे, आयु. आर. एन. कांबळे, आयु. निकेश तिरपुडे तसेच भारतीय बौद्ध समाजाचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, इतर उपासक आणि उपासिका उपस्थित होते. मला या ठिकाणी विचार मांडण्याची या सर्वांनी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन. सम्यक बुद्ध विहाराच्या पुढील कार्यास हार्दिक मंगल कामना ही दिल्या, अशी माहिती
डॉ. संतोष भोसले, (राज्याध्यक्ष, युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य) यांनी दिली.