आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

धाराशिव दत्त चौकातील समर्थ लोखंडे याचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

 

 

दर्पण न्यूज धाराशिव तालुका प्रतिनिधी (संतोष खुणे):-

धाराशिव, येथील दत्त चौक, गणेश नगरमधील कु.समर्थ संजय लोखंडे याने नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) च्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. समर्थने तब्बल 97% गुण मिळवून शाळेत आणि परिसरात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. समर्थ ला विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले असून गणित या विषयात 100 पैकी 99 गुण मिळाले आहेत. तर हिंदी आणि समाजशास्त्र विषयात समर्थने 100 पैकी 97 गुण मिळविले असून इंग्रजी या विषयात त्याला 91 गुण मिळाले आहेत. तो फ्लाईंग किडस् इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव (आदर्श शिक्षण प्रसारण मंडळ, धाराशिव) या शाळेचा विद्यार्थी आहे.
समर्थचे वडील श्री. संजय लोखंडे हे शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, धाराशिव येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत, तर त्याची आई सौ. वैशाली लोखंडे गृहिणी आहेत. घरातून मिळालेल्या शैक्षणिक वातावरणाचा आणि संस्कारांचा समर्थच्या यशात मोलाचा वाटा आहे. समर्थला सायली नावाची एक मोठी बहीण असून ती बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे सायलीने देखील दहावीत 98% आणि बारावीत 85% गुण मिळवले होते, त्यामुळे घरात शिक्षणाची मोठी परंपरा आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल समर्थने शाळेतील प्राचार्य श्री.चतुर्वेदी सर, शिक्षक श्री.रजत पांडे सर आणि श्री.राहुल माल सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले. माझे आई-वडील, मोठी बहीण आणि शिक्षक यांची प्रेरणा आणि त्यांच्या शिकवणीमुळेच हे यश संपादन करता आले, असे तो कृतज्ञतेने म्हणाला.
लहानपणापासूनच खेळ आणि अभ्यास दोन्हीमध्ये अव्वल असणाऱ्या समर्थचे भविष्यवेधी स्वप्न डॉक्टर बनण्याचे आहे. विशेष म्हणजे तो क्रिकेट अतिशय उत्तम खेळतो. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तो हे स्वप्न नक्कीच साकार करेल, यात शंका नाही. माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांच्याशी समर्थचे त्याच्या बालपणापासूनचे घनिष्ठ संबंध आहेत आणि त्यांच्याकडूनही त्याला वेळोवेळी प्रोत्साहन मिळत असते.
कु.समर्थ लोखंडे याच्या या शानदार यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. धाराशिव नगरीने एका हुशार आणि होतकरू विद्यार्थ्याची दखल घेतली असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!