बाचणी येथे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- बाचणी येथे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व बुद्धांच्या प्रतीमेचे प्रतिमापूजनानंतर प्रास्ताविक व स्वागत प्रवीण कांबळे यांनी केले.
प्रमुख वक्ते म्हणुन विजय काळे यांचे मार्गदर्शन लाभले. बुद्ध, विज्ञान आणि आजचा माणूस यावरती मनोगते त्यांनी व्यक्त केले. तसेच दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रमेश कांबळे, प्रकाश सोनाळकर,तानाजी सोनाळकर, रवी सारंग सर, संदिप कांबळे, प्रवीण सर. एम एस. देशमुख, सुनील कांबळे,कमिटी अध्यक्ष महेश कांबळे सर्व कमिटी सदस्य, व महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार राहुल कांबळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर बौद्ध उपासक उपासिका आणि मान्यवर विद्याधर देशमुख, राकेश कांबळे, एम एस देशमुख, भिकाजी सरदेसाई, रवि सारंग, प्रकाश सोनाळकर, राजन वर्धन, रमेश कांबळे, समीर कांबळे, रोहित कांबळे, मयूर कांबळे, राजेंद्र सरनाईक, एम डी कांबळे, विशाल कांबळे, प्रणित कांबळे, याबरोबर महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते