भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत आदर्श व्यक्तीमत्व विकास शिबीरास प्रारंभ

दर्पण न्यूज भिलवडी ;- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित आदर्श व्यक्तीमत्व विकास शिबीरास प्रारंभ करण्यात आला.संस्थेचे संचालक महावीर वठारे गुरुजी यांच्या हस्ते शिवराज्यभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.बालवाडी व प्राथमिक विभाग प्रमुख प्रा.मनिषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी अशी शिबिरे महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महावीर वठारे यांनी केले.
खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी प्रस्ताविक व स्वागत करून शिबिराच्या संयोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले.सौ. संध्याराणी मोरे यांनी आभार मानले.
क्रीडा विभाग प्रमुख संजय पाटील,सुबोध वाळवेकर, धनंजय साळुंखे,दिलावर डांगे,सूरज पाटील,गजानन चव्हाण,सौ.अस्मिता पाटील,सौ.राखी पाटील,सेमी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्रेयस पाटील, विठ्ठल खुटाण,सौ.प्रगती भोसले, अर्चना येसुगुडे, सौ.प्रियंका आंबोळे,अर्चना मोकाशी आदी उपस्थित होते.