नंद्याळ येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती विविध उपक्रमांनी साजरी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :-
नंद्याळ मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.
सकाळी आठ वाजता सर्व धम बांधव यांच्या वतीने शोभायात्रेचे काढण्यात आले शोभायात्रेत सर्व महिला पुरुष व लहान मुले हातामध्ये बाबासाहेबांच्या कार्याचे फलक घेऊन शिस्तीत व महापुरुषांच्या घोषणाने गावातून शोभायात्रेत वस्तूपणे सहभागी झाले होते शोभायात्रेच्या वेळेला बाबासाहेबांच्या रथाला गावातील महिलांनी मोठ्या संख्येने औक्षण व अभिवादन केले सकाळच्या शोभायात्रेनंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन नंधाळच्या लोकनियुक्त सरपंच सौ मनीषा कांबळे व बी आर कांबळे साहेब .आर.पी.आय.कागल अध्यक्ष चंद्रशेखर कोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्रिशरण व पंचशील ही घेण्यात आली यावेळी श्री हिरामणी कांबळे सर यांनी माणूस म्हणून आम्हाला हक्क आणि अधिकार देणारे बाबासाहेब हे थोर समाज सुधारक होते बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे भारताला जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते असे मनोगत व्यक्त केले त्यानंतर खुल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात विविध भागातून स्पर्धक आले होते स्पर्धा संपल्यानंतर यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले सायंकाळी सर्वांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती भोजनानंतर माणूस प्रस्तुत हाक बाबांची जागर प्रबोधनाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यासाठी पंचशील तरुण मंडळाचे अध्यक्ष आनंदा कांबळे उपाध्यक्ष भैरव कांबळे बाळासो कांबळे आनंदा कांबळे सागर कांबळे प्रशांत कांबळे दादासो कांबळे विठ्ठल कांबळे पवन कांबळे सुनील कांबळे अक्षय कांबळे प्रथमेश कांबळे साहिल कांबळे दशरथ कांबळे प्रेमचंद कांबळे रणजीत कांबळे अजय कांबळे व पंचशील तरुण मंडळाच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.