आष्टा येथील क्लेरमाँटच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश

कराटे स्पर्धेत क्लेरमाँटच्या विद्यार्थ्यांचे यश
दर्पण न्यूज भिलवडी/पलूस:- कोल्हापूर कसबा बावडा येथील श्रीराम१३ सांस्कृक्तिक भवन येथे झालेल्या १३ व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत क्लेरमाँट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी नोंदवत १७ पदकांची कमाई केली.उत्कृष्ट खेळकौशल्य आणि दमदार प्रदर्शनाच्या बळावर त्यांनी स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. यामध्ये सुवर्णपदक विजेते- प्रांजल घनवट, वेदिका कोळी, हर्ष हिप्परकर, श्रियोग पाटील, वैदिक
बुलुंगे तर रौप्यपदक विजेते आरव चौगुले, पर्व आडमुठे, वर्धन पाटील, अभयसिंह देशमुख, काव्या सावंत, कांस्यपदक विजेते अनधा थोरात, अंतरा माने, आराध्या माळी पाटील, अनन्या साळुंखे, अन्विक बुलुंगे, विराट पाटील, शौर्या बाबर या सर्व विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई करून शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले. या सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक वर्षा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल शाळेचे संस्थापक राजेश चौगुले, सचिव शितल चौगुले, उपाध्यक्ष दत्तात्रेय सोकाशी, संचालिका दीपा सोकाशी, व्यवस्थापन विकास सूर्यवंशी, शाळेचे प्राचार्य चंदनगौडा माळी पाटील तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



