सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आज सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरूवार, दि. 1 मे 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दि. 1 मे रोजी सकाळी 7.40 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून विश्रामबाग, सांगलीकडे प्रयाण. सकाळी 7.55 वाजता पोलीस परेड ग्राउंड, विश्रामबाग, सांगली येथे आगमन व महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.30 वाजता विश्रामबाग येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व अमली पदार्थ विरोधी कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा प्रशासन व प्राथमिक / माध्यमिक शिक्षण विभाग / लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थिती.
सकाळी 11.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून मिरजकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. दुपारी 3.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून नेमिनाथनगरकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता इंदिरा निवास उदय कॉलनी, नेमिनाथनगर, सांगली येथे आगमन व सुरेश आण्णा पाटील (माजी महापौर) यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. दुपारी 4.15 वाजता नेमिनाथनगर येथून दक्षिण शिवाजीनगर, बापट मळा उद्यानकडे प्रयाण. सायंकाळी 4.25 वाजता आगमन व कै. अतुल ढवळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, स्थळ – एफ 1, विठ्ठल कॉम्प्लेक्स, दक्षिण शिवाजीनगर, बापट मळा उद्यानामागे, सांगली. सायंकाळी 4.45 वाजता दक्षिण शिवाजीनगर बापट मळा येथून फौजदार गल्ली, सांगलीकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता फौजदार गल्ली येथे आगमन व रणजितसिंह सावर्डेकर पाटील (माजी नगरसेवक) यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. सायंकाळी 5.15 वाजता सांगली येथून कुंडल ता. पलूसकडे प्रयाण. सायंकाळी 6.15 वाजता पोलीस स्टेशन रोड कुंडल येथे आगमन व महेंद्र (आप्पा) लाड यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. सायंकाळी 6.30 वाजता कुंडल ईश्वरपूरकडे प्रयाण. सायंकाळी 7 वाजता यल्लमा चौक ईश्वरपूर येथे आगमन व शिवजयंती महोत्सव 2025 मिरवणूक शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार ईश्वरपूर येथून कोल्हापूरकडे प्रयाग.