राज्यपाल यांचे हस्ते शैलेश ताटे यांना गुणवंत कर्मचारी गौरव पुरस्कार प्रदान

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने) :-;महाराष्ट्र शासनाकडुन दिला जाणारा सन 2023 -2024 या वर्षीचा गुणवंत अधिकारी, कर्मचारी गौरव पुरस्कार समारंभ महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुबई येथे दिनांक 27 मे 2025 रोजीआयोजीत केला.
या पुरस्कार सोहळयामध्ये जिल्हा परिषद धाराशिव मधील सामान्य प्रशासन विभागात वरिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले श्री.शैलेश ताटे यांचा महामहिम राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांचे शुभहस्ते सपत्नीक प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
या सोहळयासाठी महामहिम श्री. सी. पी. राधाकृष्णन, मा. ना. श्री. जयकुमार गोरे मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, मा. ना. श्री. योगेश कदम, राज्यमंत्री, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, श्री. एकनाथ डवले (भा.प्र.से.) प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, मा.श्री.डॉ.प्रशांत नारनवरे (भा.प्र.से.) राज्यपालांचे सचिव, मा.श्री.एस. राममुर्ती (भा.प्र.से.) राज्यपालांचे उपसचिव, डॉ. विजय सूर्यवंशी (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त, कोकण विभाग हे उपस्थित होते.