पलूस तालुक्यातील 33 गावांचे सरपंचपद आरक्षण जाहीर

दर्पण न्यूज पलूस प्रतिनिधी :-
पलूस तालुक्यातील 33 गावांचे सरपंच पदाची आरक्षण सोडत आज पलूस तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा पर्यवेक्षक अधिकारी स्नेहल कनिचे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दिप्ती रिठे,निवासी नायब तहसीलदार डॉ.आसमा मुजावर यांनी यशस्वीरित्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली. सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडण्यात प्रशासनाला यश आले, तुपारी, खंडोबाची वाडी आणि भिलवडी स्टेशन येथील काही कार्यकर्त्यांनी हरकत घेतली परंतु त्यांच्या शंकेचे समाधान तात्काळ करण्यात आले. तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या कुंडलचे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण स्त्री करिता राखीव, बांबवडे,आंधळी, घोगाव ही गावे देखील सर्वसाधारण स्त्री करिता राखीव झाली तसेच तुपारी,नागराळे, दुधोंडी ही संवेदनशील गावे सर्वसाधारण करिता राखीव झाल्याने पलूस तालुक्यात चुरशीच्या लढती पहायला मिळणार आहेत. सरपंच आरक्षण आणि गावे पुढीलप्रमाणे :अनुसूचित जाती स्त्री राखीव करिता सावंतपुर,आमणापूर, त्याचबरोबर अनुसूचित जाती सर्व साधारण करिता दोन जागा पुणदी, वसगडे ही गावे आहेत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग च्या एकूण नऊ जागापैकी नागठाणे, दह्यारी, तावदरवाडी,सुखवाडी, चोपडेवाडी येथे स्त्री राखीव आरक्षण मिळाले असून भिलवडी रामानंदनगर,बुर्ली, राडेवाडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण करिता माळवाडी,तुपारी अंकलखोप, दुधोंडी,विठ्ठलवाडी,भिलवडी स्टेशन, नागराळे, ब्रम्हनाळ,बुरुंगवाडी,मोराळे ही गावे आरक्षित झाली असून घोगाव,खटाव, सांडगेवाडी, आंधळी, बांबवडे,कुंडल, हजारवाडी, खंडोबाची वाडी,सुर्यगाव, पुणदीवाडी ही गावे सर्वसाधारण स्त्री सरपंच पद करिता राखीव झाली आहेत.यावेळी सर्व मंडल अधिकारी,तलाठी, महसूल चा स्टाफ उपस्थित होता.