राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास : चेअरमन सुधीर जाधव
दुधोंडी येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष संस्कार शिबिराचा समारोप : डॉ पतंगरावजी कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्लीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

दर्पण न्यूज दुधोंडी वार्ताहर :-
रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष संस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम शिवाजी हायस्कूल दुधोंडी येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर जाधव हे होते.
यावेळी बोलताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास होत असतो अशा शिबिरामुळेच विद्यार्थ्यांना आयुष्यभराची शिदोरी या शिबिरामधून मिळत असते, काम करत असताना श्रमाची किंमत समजते, श्रमदान करणे व त्यातून आनंद घेणे हे खरंच कौतुकास्पद असे काम विद्यार्थ्यांनी गावामध्ये केले आहे याबद्दल समाधान असल्याचे मत सुधीर जाधव यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी प्राचार्य मेजर आर. एस.डबल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी 18 तास अभ्यास करण्याची गरज असून या काळाच्या ओघात टिकायचे असेल तर अभ्यास करणे व योग्य वळणावर योग्य त्या संधीचे सोने करणे हे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी मिलिंद जाधव, सरपंच सौ.उषाताई देशमुख, उपसरपंच विजय जाधव ,प्राचार्य अरविंद कांबळे, ग्रा. स प्रदीप रानमाळे, पत्रकार संदीप नाझरे, क्रीडा शिक्षक एस बी मोमीन, व विद्यार्थ्यांच्या मधून क्षितिजा जाधव व रोहन मस्के यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ यू.व्ही.पाटील उपस्थित होत्या. त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी दुधोंडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले व जे.के बापू जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. काकासाहेब भोसले ,धनेश गवारी व सर्व कमिटी सदस्य यांचे विशेष प्रयत्नातून शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.