पलूस येथे टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित जागतिक टेलर्स दिन उत्साहात : महिलांचा मोठा सहभाग
टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बसवराज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन

दर्पण न्यूज पलूस : – सांगली जिल्हा पलूस येथे टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित जागतिक टेलर्स दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिलांचा मोठा सहभाग होता.
*28 फेब्रुवारी जागतिक टेलर्स दिनानिमित्त पलूस येथे पलूस तालुक्यातील महिलासाठी एकदिवसीय टेलरिंग सेमिनारचे नियोजन करण्यात आले होते.
यामध्ये 235 महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षक म्हूणन कय्युम कक्कर सांगली यांनी बोटनेक ब्लाऊज कटिंग व स्टिचींग आणि स्टँड काँलर ब्लाऊजचे प्रशिक्षण दिले. प्रमुख पाहुणे म्हूणन रमेश टेक्स्टाईल पलूस चे MD मा. साधना बनकर तसेच श्री बसवराज पाटील अध्यक्ष -टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य , आणि शशिकांत कोपार्डे सचिव टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य , व पलूस व्यापारी संघटनेचे संस्थापक श्री कुमार माळी, तसेच पलूस तालुका टेलर असोसिएशन चे अध्यक्ष महादेव कचरे , पलूस तालुका टेलर असोसिएशनचे सचिव विकास परमेश्वर जाधव,कार्याध्यक्ष विनायक गंजी, उपाध्यक्ष संजय बुचडे, पलूस शहर अध्यक्ष निखिल बुचडे उपाध्यक्ष अमोल खामकर, सचिव अभिजीत म्हेत्रे , रघुनाथ पडगे, चंद्रकांत जाधव, श्रीधर गंजी,चंद्रकांत गोंजारी, शरद पवार, सुहास खटावकर,, सतिश मोटकट्टे, दिलीप बुचडे आप्पा, सचिन माळी, आणि पलूस तालुक्यातील सर्व टेलर बंधू आणि भगिनी उपस्तिथ होते*