पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोमवारी सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दि. 21 एप्रिल 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दि. 21 एप्रिल रोजी सकाळी 5.12 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. सकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली कडे प्रयाण. सकाळी 8.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना जिल्हास्तरीय समिती बैठकीस उपस्थिती. सकाळी 9.30 वाजता क्राईम टास्क फोर्स आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी व आयुक्त सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका यांच्यासमवेत चर्चेसाठी राखीव. सकाळी 10.30 वाजता जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवडा उपक्रमांतर्गत कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. सकाळी 11.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून माधवनगर कडे प्रयाण. दुपारी 12.05 वाजता माधवनगर येथे आगमन व शिवाजी (पप्पू) राजाराम डोंगरे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सांगली यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 12.30 वाजता माधवनगर येथून शासकीय विश्रामगृह मिरज कडे प्रयाण. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून तासगाव कडे प्रयाण. दुपारी 4 वाजता शिवनेरी चौक, तासगाव येथे आगमन व शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तासगाव यांच्यावतीने आयोजित दुर्गामाता प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभानिमित्त विविध धार्मिक विधी कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.30 वाजता तासगाव येथून बिसुर ता. मिरज कडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता मौजे बिसुर येथे आगमन व मौजे बिसुर येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आणि कर्नाळ बिसुर कवलापूर प्र.जि.मा. 124 या रस्त्याचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार बिसुर येथून शासकीय विश्रामगृह मिरज कडे प्रयाण, आगमन व राखीव. रात्री 9.15 वाजता मिरज रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. रात्री 9.50 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.