कोल्हापूर येथील जिल्हा कृषि अधीक्षक सुनील जगन्नाथ जाधव यांना 9 हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार हे जैविक शेती तसेच सेंद्रिय शेती करण्याबाबत शेतकरी लोकांना मार्गदर्शन करत असतात तरी शेतकऱ्यांना लागणारे खत,बी बियाणे आणि कीटकनाशके यांची विक्री करण्याकरिता तक्रारदार यांना स्व:ताचे दुकान चालू करावयाचे होते
त्याकरीता आवश्यक असलेला परवाना (लायसन)मिळण्याकरिता तक्रारदार यांनी वरील कार्यालयाकडे ऑनलाईन तसेच ऑफ लाइन अर्ज केला होता सदरचा अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाही करून वरिष्ठांच्याकडे पाठविणेसाठी आरोपी सूनिल जगन्नाथ जाधव वय 50 पद कूषीअधिकारी वर्ग—2 नेमणूक जिल्हा अधिक्षक कूषी विभाग कोल्हापूर””कसबा बावङा रा. इंद्रजित काॅलनी फ्लॅट क्र 405 गंगाधाम”अपार्टमेंट जाधववाङी यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम 10,000 /- रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 9,000 /- रुपयांची लाच मागणी करून मागणी केलेली लाच रक्कम 9,000/- ₹ तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना त्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक श्रिमती आसमा मूल्ला””संजीव बंबरगेकर””पोना सचीन पाटील””पो.हे.काॅ अजय चव्हाण”विकास माने आदीनी केली.