पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा उद्या कोल्हापूर जिल्हा दौरा

दर्पण न्यूज कोल्हापूर,ः अनिल पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन. सकाळी 7.10 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल येथून शासकीय विश्रामगृह, कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथून शिवाजी विद्यापीठकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शिवाजी विद्यापीठ येथे आगमन व भगवान महावीर अध्यासन प्रारंभिक बांधकाम उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शिवाजी विद्यापीठ) सकाळी 11.30 वाजता ग्राहक कार्यकर्ता एक दिवसीय कार्यशाळा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : आजीवन अध्ययन व विस्तार विभाग शिक्षण शास्त्र सभागृह, शिवाजी विद्यापीठ) दुपारी 12.15 वाजता शिवाजी विद्यापीठ येथून वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल उद्यमनगरकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल उद्यमनगर येथे आगमन व एम. जे.पी.जे. ए. वाय लोकार्पण व शुभारंभ सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल उद्यमनगर) सोयीनुसार वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल उद्यमनगर येथून आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगडकडे प्रयाण. सोयीनुसार आनंद निवास येथे आगमन व राखीव.