डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त स्वाधार मतिमंद मुलींची शाळा आळणी येथे गणवेश वाटप
एस बी आय एस सी एस टी व बी सी संघटनेच्या पुढाकारातून भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय कार्यालय धाराशिव यांचे सहकार्य

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने) :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त व क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून 11 एप्रिल 2025 रोजी स्वाधार मतिमंद मुलींची शाळा आळणी तालुका जिल्हा धाराशिव येथे एस बी आय एस सी एस टी व बी सी संघटनेच्या पुढाकारातून भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय कार्यालय धाराशिव यांच्या सहकार्याने गणवेश वाटप व अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला अभिवादन करून करण्यात आली.यानंतर स्वाधार मतिमंद शाळेतील विद्यार्थिनींनी सुरेल असे स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले.
यानंतर भारतीय स्टेट बँकेचे धाराशिव चे क्षेत्रीय प्रबंधक श्री नरसिंह कुमार मेहता , श्री अधिकारी संघटनेचे नांदेड झोनचे अध्यक्ष श्री.उमेश आडगावकर तसेच सी आर एस श्री किरण जिंतूरकर , सेवा संघटनेचे नांदेड झोनचे अध्यक्ष श्री सदाशिव चाळणेवाड , सेवा संघटनेच्या नांदेड झोनच्या सेवा च्या डीजीएस श्रीमती शिल्पा जिंतुरकर,एस बी आय स्टाफ युनियनचे धाराशिव चे श्री राहुल जोशी, श्री दादा बनसोडे मुख्य प्रबंधक व श्री विनोद खरात मुख्य प्रबंधक यांच्या हस्ते विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले.
याप्रसंगी श्री. किरण जिंतूरकर , श्रीमती शिल्पा जिंतूरकर तसेच क्षेत्रीय प्रबंधक श्री.मेहता सर यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनीना पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळणारे शाळेचे मुख्याध्यापक श्री थोडसरे व त्यांच्या सर्व सहकारी वर्गाचे कौतुक केले. यापुढेही या प्रकारचे साहाय्य भारतीय स्टेट बँक व संघटनेमार्फत शाळेसाठी करत राहू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सेवा चे धाराशिव चे रिजनल सेक्रेटरी डॉ.पद्माकर चांदणे व असिस्टंट रिजनल सेक्रेटरी श्री प्रफुल्ल गायकवाड धाराशिव यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केल.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती कांबळे यांनी केले.