भिलवडी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनिल खराडे यांच्याकडून मोफत 500 वड्यांचे वाटप ; अनेकांसमोर एक आदर्श

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील येथील अनिल उर्फ पिनू खराडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 500 वड्यांचे मोफत वाटप केले.
घरची परिस्थिती बेताची असल्याने भजी व वडापाव विकून उदरनिर्वाह करणारे सिद्धविनायक नाष्टा सेंटरचे मालक अनिल उर्फ पिनू खराडे हे नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेत असतात. आपण या समाजाचा घटक आहोत, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने ते नेहमी कार्य करीत असतात. दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन तथा काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते बाळासाहेब काका मोहिते व भिलवडी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते व सांगली सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजू दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिनू खराडे यांनी काही दिवसापूर्वी झालेल्या शिवजयंतीच्या निमित्ताने शिवभक्तांना मोफत वडे खाण्यासाठी दिले होते. त्याच पद्धतीने 14 एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्ताने त्यांनी मोफत वडे खाऊ घालण्याचा संकल्प केला. बाबासाहेबांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक निघाली असताना. या मिरवणुकी मध्ये सहभागी झालेल्या भीम अनुयायांना मुख्य बाजारपेठेमध्ये आल्यानंतर तब्बल 500 वड्यांचे मोफत वाटप पिनू खराडे यांनी केले. त्यांचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून, प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजसेवा करणे ही सोपी गोष्ट नाही असे वक्तव्य सुप्रसिद्ध व्याख्याते अभिजीत कोळी यांनी केले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पलूस तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष अविनाश काळीबाग, युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष यश बाबा ऐवळे, विरेश होवाळ,विशाल सोळवंडे आदी उपस्थित होते.