दुधोंडी येथे कृष्णाकाठ दूध डेअरीचा उच्चांकी बोनस वाटप
कृष्णाकाठ' चा जिल्ह्यामध्ये नावलौकिक: डॉ. शिवाजीराव कदम

दुधोंडी) :-
कृष्णाकाठ दूध डेअरी ने दिवाळीच्या सणाच्या दिवशी बोनस देऊन सर्वसामान्य शेतकऱ्याला आधार दिला आहे, स्व यशवंतरावजी चव्हाण यांच्या कृष्णाकाठच्या आत्मकथा आम्ही पहिली आहे, आणि या ठिकाणी जे के बापू जाधव यांच्या कृष्णाकाठ ने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार केला आहे, त्यामुळे कृष्णाकाठ उद्योग समूहाचा भागामध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाव लौकिक झालेला दिसून आला आहे, यांचा आदर्श इतर दूध डेअरी यांनी घेतला पाहीजे असे मत भारती विद्यापिठ चे कुलपती व उदगीरी शुगर्स प्रा लि चे संस्थापक व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ शिवाजीराव कदम यांनी कृष्णाकाठ दूध डेअरीच्या बोनस व भेट वाटपा च्या कार्यक्रमाप्रसंगी
मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे व्हा चेअरमन महेंद्र आप्पा लाड व कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे. के बापू जाधव प्रमुख उपस्थिती मध्ये होते, तर या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक कृष्णाकाठ चे व्हा चेअरमन प्रशांत चव्हाण यांनी केले.
आजच्या या बदलत्या काळात घराघरापर्यंत पोहोचण्याचे तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचे साधन म्हणजे दूध डेअरी आहे, आणि त्यानुसार दूध डेअरीने सुद्धा बदलत्या काळानुसार आपल्यामध्ये बदल केला पाहीजे, तसेच या कृष्णाकाठ दूध डेअरी ने सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत म्हणून बोनस व भेट वस्तूचे वाटप करून दिवाळी मध्ये एक प्रकारची मदतच केली आहे, असे म्हणावे लागेल तसेच त्या शेतकऱ्यांना दिवाळी मध्ये कृष्णाकाठ दूध डेअरी ने हातभार लावल्याने दिवाळी सुखकर व समृद्धीने जाईल असे मत रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महिंद्र लाड यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
यावेळी कृष्णाकाठ दूध डेअरीचा माहिती देताना संस्थापक जे के बापू जाधव म्हणाले की संस्थेची स्थापना 2004 साली झाली असून, या डेअरीची प्रथम सुरुवात 50 लिटरच्या दुधापासून झाली आहे, ते आज 2500 लिटरच्या दुधाचे संकलन होत आहे, ते आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आज या संस्थेने स्वतःच्या स्वमालकीची जागा खरेदी केली आहे, त्यामुळे दूध डेअरी ही सुस्थितीत व सुरळीत आहे, अजूनही या दूध डेअरीचा दूध वाढवण्याचा आमचा मानस असल्याने डेअरीचे पंचक्रोशीतील 13 गावे असल्याने दूध उत्पादकांनी दूध डेअरीस दूध घालावे असे अहवाहनदेखील डेअरीचे संस्थापक जे के (बापू) जाधव यांनी केले.
दूध डेअरीने सर्वात उच्चांकी बोनस व भेट वस्तूच्या स्वरूपात दूध उत्पादकांना वाटप केला आहे, म्हैसच्या दुधासाठी 3 रुपये 20 पैसे तर गाईच्या दुधासाठी 2 रुपये प्रमाणे दर देण्यात आला आहे, तर 15 लाखाच्या वर संस्थेने दूध उत्पादकांना दिवाळी हातभार लावण्याचे काम केले आहे, आज अखेर कृष्णाकाठ उद्योग समूहाने व मानसिंग बँकेने फक्त दुधोंडी गावामध्ये तर 1 कोटी 50 लाखापर्यंत बोनस वाटप करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वात उच्चाकी दर देण्याचे काम या कृष्णाकाठ दूध डेअरीने व कृष्णाकाठ उद्योग समूहाने केला आहे, असे आपले मत जे के बापू जाधव यांनी या कार्यक्रमावेळी केले.
या कार्यक्रमावेळी मानसिंग बँकेचे चेअरमन युवा नेते सुधीर (भैय्या) जाधव, अरविंद माने गटविकास अधिकारी पंचायत समिती पलूस, वैभव पाटील शाखा अभियंता पलूस पंचायत समिती, संकपाळ रयत शिक्षण संस्था, कुंडलचे सर्जेराव पवार, कृष्णाकाठ दूध डेअरी चे चेअरमन संदीप पाटील, दुधोंडीच्या लोकनियुक्त सरपंच उषा देशमुख, भारती शिक्षण मंडळाचे सचिव मिलिंद जाधव, रवींद्र आरबुने माजी चेअरमन कृष्णा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, दुधोंडी चे माजी लोकनियुक्त सरपंच विजय आरबुने, माजी उपसरपंच रवींद्र नलवडे, सुरेश रानमाळे डॉ पतंगराव कदम खरेदी विक्री संघाचे संचालक, सांगली जिल्हा सहकारी बोर्डाचे व्हा चेअरमन भालचंद्र आरबुने, हिंदुराव कदम दुधोंडी ग्रामविकास सोसायटी चे माजी चेअरमन, विद्यमान चेअरमन आनंदराव कदम, पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील नलवडे, कृष्णा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन दिलीप जाधव, व्हा चेअरमन विजय जाधव , मानसिंग बँकेचे संचालक सतीश धनवडे, हनिफ मुजावर, आप्पासो चव्हाण, अनिल शेवाळे, कृष्णाकाठ डी हायड्रेशनचे चेअरमन सुहास चव्हाण, व्हा चेअरमन जोतिराम साळुंखे, कृषिभूषण सुरेश चव्हाण, शिवाजी जलसिंचन योजनेचे चेअरमन रामचंद्र जाधव, व्हा चेअरमन भीमराव कदम, संचालक वसंतराव नलवडे, सदाशिव कदम, आनंदराव आरबुने, दुधोंडी ग्रामपंचायत सदस्य राजेश तिरमारे, बब्बर मुजावर, कुमार साळुंखे, तानाजी नलवडे, दुर्गा जाधव, अनिलकुमार जाधव, अशोक भोसले, श्रीकांत कदम, निवास नांगरे, अशोक भोसले, तसेच कृष्णाकाठ दूध? डेअरी चे संचालक हणमंत महाडिक, रघुनाथ जाधव, चंद्रकांत जाधव, मच्छिद्र तिरमारे, सिकंदर मुजावर, मानसिंग बँकेचे जनरल मॅनेजर संभाजी जाधव, कृष्णाकाठ चे सचिव सुनील जाधव तसेच गावातील इतर संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर संस्थेचे सभासद, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते, आभार मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर (भैया) जाधव यांनी मानले.