महाराष्ट्र
करवीर तालुक्यातील बालिंगे हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कोल्हापूरःअनिल पाटील
करवीर तालूक्यातील बालिंगे येथील हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते,
हायस्कूलचे मूख्याध्यापक पटवेगार यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेचहायस्कूलमध्ये ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. ग्रंथ दिंडी बालिंगे गावातून काढण्यात आली. दिंडीतून ग्रंथाचे व वाचनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून दिली. व ग्रंथ वाचनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.