मिरज शहरात जनसुराज्य शक्ती पक्षाचा झंझावात ; अनेक दिग्गजांचा पक्ष प्रवेश ; प्रदेशाध्यक्ष, राज्याचे नेते समित कदम यांची उपस्थिती

दर्पण न्यूज मिरज -*मिरज शहरात जनसुराज्य शक्ती पक्षाचा झंझावात सुरू असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून निष्ठावंत असणारे, राजकिय आणि सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविलेले पक्षातील अनेक पदाधिकारी यांचा पक्ष प्रवेश होतो आहे.
*राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून निष्ठावंत असणारे, राजकिय आणि सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविलेले नेते मा. समीर भैय्या मालगावेआणि मिरज महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महादेव आण्णा कुरणे यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे नेते मा. समित दादा कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.*
*यावेळी बोलताना समीर भैय्या म्हणाले की जनसुराज्य शक्ती पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष आहे हा पक्ष सर्वधर्म समभावाने चालणारा आहे. आमचे नेते मा. समित दादा हे अत्यंत मनमिळावू, मितभाषी आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारे आहेत, त्यामुळे मी आज या पक्षात प्रवेश केला. दादांनी दाखवलेला विश्वास येणाऱ्या काळात नक्कीच सार्थ करू.*
आनंद पुजारी साहेब, अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष प्रविण धेंडे, मिरज शहर चे डॉ.म्हेत्रे,युवा पदाधिकारी चैतन्य कलगुटगी, उपस्थित होते.*